'सध्या लूज बॉल मिळतायत,त्यांना सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते,क्रिकेट खेळताना देवेंद्र फडणवीसांचा टोला
मुंबई : सध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. त्यांना मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातून फटकेबाजी केली आहे. वडाळा विधानसभा मतदार संघात आज भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या आमदार चषकाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फलंदाजी करत काही फटके देखील लगावले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला हल्ली सर्व लूज बॉल येत आहेत, बॅटिंग करायला मजा येतेय, मी बॉडिलाईन गोलंदाजी करत नाही, योग्य पद्धतीनं खेळतो.
Tags :
Devendra Fadnavis