Solapur Oxygen Tank Blast : सोलापूरमधील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा स्फोट
सोलापूर : सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. रात्री 11 च्या सुमारास रुग्णालयात असलेल्या दोन टाक्यांपैकी एका टाकीचा स्फोट झाला. स्फोटात झालेल्या घटनेदरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. मृतामध्ये एक रुग्ण आणि एका रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे. दोघांच्या मृत्यूस ऑक्सिजन टॅंकचा स्फोटच कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले आहेत. रुग्णाची परिस्थिती आधीच खालावलेली असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.