Devendra Fadnavis on Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंना उमेदवारी, निवडून आणण्यासाठी भाजप पाठिशी

Continues below advertisement

Kalyan Lok Sabha constituency : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करताच कल्याण लोकसभा मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha Election) लढत निश्चित झाली आहे. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि वैशाली दरेकर राणे (Vaishali Darekar Rane) यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर ठाकरेंकडून वैशाली दरेकर यांना तिकिट देण्यात आले आहे. या लढतीकडे मुंबईसह राज्याचं लक्ष लागलेय. त्याला कारणही तसेच आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर श्रीकांत शिंदेविरोधात उद्धव ठाकरे कुणाला तिकिट देणार? याची उत्सुकता तर होतीच.

पण श्रीकांत शिंदे यांना स्थानिक भाजप नेत्यांकडूनही जोरदार विरोध होता. कल्याणची जागा श्रीकांत शिंदेंना दिल्यास भाजपचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही, असा ठरावच भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या (ganpat gaikwad) कार्यालयात मंजूर झाला. पण आता श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. युती धर्म पाळून कट्टर विरोधक श्रीकांत शिंदेंसाठी गणपत गायकवाड काम करणार का? की वेगळी भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस गणपत गायकवाड यांची समजूत काढणार का? हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram