Devendra Fadnavis On Police Requirement : देवेंद्र फडणवीसांची राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा

राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी समोर आलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. अर्ज सादर करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, विविध प्रमाणपत्र आणि भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola