Devendra Fadnavis on MVA Morcha Permission : मविआच्या मोर्चाला परवानगीची अडचण नाही
Devendra Fadnavis on MVA Morcha Permission : महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळणार की नाही?, यावरून संभ्रम होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक वक्तव्य केलंय. महाविकास आघाडीच्या मोर्चाचा मार्ग आणि स्वरुप याबाबत चर्चा झालीय, त्यामुळे मोर्चाला परवानगी देण्यात अडचण नसल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय. त्याचसोबत कायदा-सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे याची काळजी घ्या, अशी सूचनाही त्यांनी केलीय.