Devendra Fadnavis on Police Bharati : पोलीस दलातील 20 हजार जागांसाठी भरती होणार - देवेंद्र फडणवीस
राज्यात 20 हजार पोलिसांची पद भरली जाणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. आता भरतीची एक जाहिरात निघालीय, आणखी 12 हजार पदांची भरती करणार असल्याचं फडणवीस म्हणालेत. पोलिस विभागातील भरतीबाबत या पूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहीरात काढण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी 12 हजार पदांसाठीची जाहीरात लवकरात लवकर काढण्यात येईल. या भरतीमुळे पोलिस दलाला चांगली मदत होईल. या भरतीसाठी लकरता लवकर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं यावेळी दवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra Police Top Marathi News Devendra Fadnavis Maharashtra News Marathi News Abp Maza Live Devendra Fadnavis Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Eknath Shinde