
BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुका ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होतील?Devendra Fadnavis यांचे संकेत
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एक मोठं वक्तव्य केलंय. महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, असं मोठं विधान फडणवीसांनी केलंय. पुण्यात भाजपच्या घर चलो अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादीनं सुप्रीम कोर्टात याचिका केल्यानं या निवडणुका कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे. काही दिवसांआधी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असं सूचक वक्तव्य केलं होतं.
Continues below advertisement