Devendra Fadnavis : सरकारी काम टक्केवारीसाठी थांबवलं तर खपवून घेणार नाही , लोकप्रतिनिधी असेल तरी
सरकारी काम टक्केवारीसाठी थांबवलं तर खपवून घेणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी टक्केवारी घेणाऱ्यांना इशारा दिला. टक्केवारीसाठी काम थांबवणारे लोकप्रतिनिधी अथवा अन्य कुणी असले तरी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम फडणवीस यांनी दिलाय. ते काय म्हणालेत पाहुयात...