Devendra Fadanvis: मुख्यमंत्री आहेत पण त्यांना मुख्यमंत्री मानायला कुणी तयार नाही

महाराष्ट्रातलं आतापर्यंतचं हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. सध्या येथे कायद्याचे राज्य नाही तर ‘काय ते द्या' या पद्धतीने राज्य चालवले जात आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही, असे फडणवीस म्हणाले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण चालले आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध उघड झाले आहेत. सुरवातीला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीसंधर्भात शुभेच्छा दिल्या पण नंतर या महाराष्ट्रात म्हणजेच या राज्यात सरकार कुठे आहे हे विचारण्याची आता वेळ आली आहे असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे. त्याचबरोबर "मुख्यमंत्री आहेत पण त्यांना मुख्यमंत्री मानायला कुणी तयार नाही" असं देखील ते बोललेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola