Passport Deven Bharti : पासपोर्ट प्रकरणात आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना क्लीनचिट ABP Majha

Passport Deven Bharti : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययू विभागाने क्लीनचिट दिलीय. भाजप नेते हैदर आझम खान यांच्या पत्नी रेश्मा खेराती खान यांच्याविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. रेश्मा यांनी खोटं जन्मप्रमाणपत्र बनवून पासपोर्टसाठी प्राधिकरणाला दिल्याचा आरोप आहे. देवेन भारती यांनी विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षकावर रेश्माविरुद्ध पाठपुरावा करू नये यासाठी दबाव आणला असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी देवेन भारती आणि दीपक फडांगरे यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola