Narendra Modi Mumbai Daura : मुंबईतील विकासकामांचा शुभारंभ नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे शुक्रवारी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच गरजेच्या विकासकामांचा शुभारंभ आणि प्रकल्पांचा लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडणार आहे... दरम्यान पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उडवण्यास मज्जाव करण्यात आलाय. एम.एम.आर.डी.ए मैदान, गुंदवली आणि मोगरापाडा ही ३ ठिकाणं नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आलीत.. मोदींची सभा ज्या बीकेसी मैदानात होणार आहे त्या मैदानाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुपारी पाहणी केली..यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते.... मैदानातील प्रवेश, बैठकव्यवस्था, मंच, आणि इतर सर्व व्यवस्थांची त्यांनी पाहणी करत आढावा घेतला... तर दुसरीकडे संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बीकेसीतल्या मैदानात जाऊन पाहाणी केली.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola