Old Pension Scheme:जुन्या पेन्शनसाठी छ.संभाजीनगरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांची निदर्शनं

Continues below advertisement

जुन्या पेन्शनसाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शन केली आहेत. एकीकडे राज्य सरकारचं अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे सर्वसामान्यांनी त्यांच्या किमान मागण्यांसाठी एल्गार पुकारलाय एकीकडे जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उसलंय तर  त्यामुळे राज्यभरातील सर्वसामान्य जनतेची सरकारी कामं रखडायला सुरुवात झालेय.. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचं टेन्शन असताना दुसरीडे असतानाच आता सरकारपुढे शेतकऱ्यांच्या लाल वादळानेही मोठं आव्हान उभं केलंय. नाशिकहून निघालेला हजारो शेतकऱ्यांचा जत्थाच्या जत्था चालत मुंबईच्या दिशेने सरकतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निरोप पाठवला तरी, आता माघार नाही... असा निर्धारी पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे सरकारच्या एका बाजूला कर्मचारी संपाचा आड आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या मोर्चाची विहिरही आहे. यातून मध्यममार्ग काढण्याचं आव्हान सरकारपुढे आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram