Delhi MCD Election Results 2022 : दिल्ली महापालिकेचा निकाल, भाजप आणि आपची प्रतिष्ठा पणाला
abp majha web team
Updated at:
07 Dec 2022 09:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDelhi MCD Election Results 2022 : दिल्ली महानगरपालिकेच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, आज दिल्ली महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. थोड्याच वेळाता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आम आदमी पक्षासह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीये. भाजपनं तब्बल ७ मुख्यमंत्री, १७ कॅबिनेटमंत्री या निवडणुकीच्या प्रचारासाठी लावले होते. मात्र, एक्झिट पोलनुसार या निवडणुकीत आप भाजपचा पराभव करेल असं दिसतंय. दिल्लीतील 250 वॉर्डसाठी 1 हजार 349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. निकालानंतर दुपारी ३ वाजता अरविंद केजरीवालांचं भाषण होणार आहे.