Uddhav Thackeray Uncut | सीएएला घाबरण्याचं कारण नाही, एनपीआरला विरोध नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी सीएए, एनआरसी आणि एनपीआर या कायद्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली.. सीएएला घाबरण्याचं काही एक कारण नसून, एनआरसी हा फक्त आसाममध्येच लागू होणार असल्याची माहिची उद्धव ठाकरेंनी मोदींशी केलेल्या चर्चेनंतर दिलीय. तर एनपीआर हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याला विरोध नसल्याचंही उद्ध ठाकरेंनी स्पष्ट केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तिन्ही कायद्यांना तीव्र विरोध आहे. अशात उद्धव ठाकरेंनी कायद्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेनंतर सोनिया गांधी आणि शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे सोनिया गंधींच्या निवासस्थानी दाखल झालेत.. या बैठकीत सोनिया गांधी कायद्यासंर्भात काय भूमिका मांडताहेत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे