Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी संघर्ष होणार? पालिका कार्यालयाबाहेर बंदोबस्त

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सामना रंगलाय. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून या मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज करण्यात आलाय.. मात्र पालिकेकडून अद्याप कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. या संदर्भात पालिका प्रशासन विधी विभागाचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे. भविष्यात हे प्रकरण न्यायालयात गेल्यास आपली बाजू सुरक्षित राहावी यासाठी पालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळतंय.. दोन्ही गटापैकी कुणाला मेळाव्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पालिका प्रशासनापुढे पेच आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola