Nagpur : गडकरींच्या घराबाहेर मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Continues below advertisement

नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन सुरु केलं आहे. याचवेळी गडकरींच्या घराखाली भाजपचेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील जमा झाले आहेत. यामुळं तणाव वाढला आहे. देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याविरोधात काँग्रेसनं राज्यभर आंदोलन केलं होतं. आज नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलन केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram