Congress Party : गांधी कुटुंबीयांनी पक्षाचं नेतृत्त्व सोडून नव्या नेतृत्वाला वाव द्यावा : ABP Majha

Congress Party : पाच राज्यांतल्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील कलह वाढलाय. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या जी २३ गटाच्या नेत्यांची बैठक आज रात्री कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी होणार आहे. गांधी कुटुंबीयांनी पक्षाचं नेतृत्त्व सोडून नव्या नेतृत्वाला वाव द्यावा, असं आवाहन कपिल सिब्बल यांनी निकालानंतर केलंय. या पार्श्वभूमीवर त्यांनी जी २३ गटातील नेत्यांना रात्री जेवणासाठी बोलावलं आहे. त्यानंतर जी २३ नेत्यांच्या बैठकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे...... सर्वसमावेशक आणि सामूहिक नेतृत्त्वच काँग्रेसला तारू शकतं, जी-२३ नेत्यांची भूमिका



  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola