Congress Leader Rahul Gandhi : राहुल गांधींना आज खासदारकी बहाल होणार? : ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसबा सचिवालय सोमवारी पडताळून पाहणार आहे. त्यानुसार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे याबाबत निर्णय घेतील. त्यामुळे राहुल गांधींच्या खासदारकीची चावी ओम बिर्ला यांच्या हाती असणार आहे. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी याबाबत ओम बिर्लांना भेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत पुढील रणनीती आखण्यासाठी काँग्रेसनं आज सकाळी साडे दहा वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. राहुल गांधींना सदस्यत्व बहाल करण्याच्या मुद्दय़ावरून चालढकल करण्यात आली तर सभागृहात हा विषय जोरकसणे मांडण्याबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते.
Continues below advertisement