Congress VS BJP | सुशांतप्रकरणी भाजपचाही तपास करा, काँग्रेसची मागणी, संशयाच्या गर्तेतल्या संदिप सिंहचा फडणवीसांसोबत फोटो

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.  संदीप सिंह याचा देवेंद्र फडणवीसांसोबतचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. सुशांतसिंह प्रकरणात चित्रपट निर्माता संदीप सिंह वादात आहे. संदीप सिंह हा 'पंतप्रधान मोदी' यांच्यावरील चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपट पोस्टर प्रकाशनावेळी संदीप सिंह हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्यासपीठावर दिसत आहे. त्यामुळं 'सुशांतप्रकरणी संदीप सिंहची चौकशी करताना भाजपचाही तपास करावा, ड्रग्जप्रकरणी चौकशी करताना भाजप अँगलनेही तपास करा', असं सचिन सावंत यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola