Punjab : सभेला गर्दी न जमल्याने पंतप्रधानांचा दौरा रद्द, काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर

Continues below advertisement

चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावेळी त्यांचा ताफा निदर्शकांनी तब्बल 15 ते 20 मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द केला. आता यावरुन देशातील राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाब सरकारला यावरुन जाब विचारल्यानंतर त्याला काँग्रेसने उत्तर दिलं आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यामागे निदर्शकांचे कारण नसून मोदींच्या सभेतील मोकळ्या खुर्च्या आहेत असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram