Mumbai Corona : मुंबईत कोरोनाचा स्फोट, 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची नोंद

Mumbai Coronavirus Cases Today  : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा एकदा मुंबईत कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची भर पडली आहे.  मागील 24 तासांत 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या 15 हजार 166 रुग्णापैकी 1218 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. इतर रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मुंबईतील सक्रीय रुग्णाची संख्या 61,923  इतकी झाली आहे.  मुंबईत सध्या 30565 बेड्समधील 5104 बेड्स सध्या वापरात आहेत. मुंबईतील 462 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर 20 कंटेमेंट झोन आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola