Congress : काँग्रेसची धुरा कुणाच्या खांद्यावर? पक्ष गांधीमुक्त करण्याची वेळ

Congress Committee Meeting : नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यामध्ये काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या हाती असलेलं पंजाब राज्य आम आदमी पार्टीच्या हाती गेलं आहे. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसला खूप अपेक्षा होत्या, मात्र, जनतेनं काँग्रेसला या निवडणुकीतही नाकारलं आहे. दरम्यान, या निकालांच्या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. काँग्रेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी सकाळी 10.30 वाजता काँग्रेस संसदीय दलाची आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. इतर मुद्द्यांशिवाय निवडणुकीतील दारुण पराभवावरही मंथन होईल, असे मानले जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत G-23 चे नेतेही असतील, जे नेतृत्व बदल आणि संघटनात्मक सुधारणांच्या मागणीचा पुनरुच्चार करु शकतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola