Gopichand Padalkar | शरद पवारांबद्दल आक्षपार्ह विधान केल्यानंतर गोपीचंद पडळकरांवर कलम 502/2 अंतर्गत गुन्हा
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांनी काल पंढरपूर येथे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकाणी आंदोलने सुरु केली होती. बारामती शहर पोलीस ठाण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आणि त्यांच्याविरोधात तक्रार दाखल कारण्यात आली होती. त्यानुसार युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ यांच्या फिर्यादीवरुन बारामती शहर पोलीस ठाण्यात 502/ 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Gopichand Padalkar Sangli NCP Protest Gopichand Padalkar Chandrakant Patil BJP Sharad Pawar Ncp