Salon Reopen | राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, 28 जूनपासून राज्यात सलून उघडण्यास परवानगी

मुंबई : राज्य सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 28 जूनपासून राज्यातले सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून बंद ठेवण्यात आली होती. तेव्हापासून सलूनचालक दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची विनंती करत होते.

सलूनमधून मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने अद्यापपर्यंत सलून उघडण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद असल्यामुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकारने सलून पुन्हा सुरु करायला परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाने केली होती. यानंतर आता राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola