Majha Maharashta Majha Vision | राज्य सरकारचं स्टेअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात :अशोक चव्हाण

Continues below advertisement

सध्या राज्यात तीन पक्षांच सरकार असलं तरी राज्य सरकारचं स्टेअरिंग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचं सार्वजनिक बांधाकम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास सरकार पुढील पाच वर्षे टिकेल असा विश्वास देखील चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केला.

सध्या राज्य सरकारबद्दल ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी नेहमी या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे, याबाबत सर्वाधिक चर्चा रंगलेल्या दिसतात. तुम्हाला काय वाटतं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्री आहे. सरकार चालवण्याचे काम ते करतात. आम्ही आमची मत त्यांच्यासमोर मांडतो परंतु अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो. तो आम्हाला मान्य आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram