CM Eknath Shinde On Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही : मु्ख्यमंत्री

Continues below advertisement

पावसाची आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंची... खरंतर, फेब्रुवारी महिना म्हणजे हिवाळ्याने काढता पाय घेण्याचा आणि उन्हाळ्याने दबक्या पावलांनी येण्याचा काळ... मात्र याच फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच, पाऊस एखाद्या वैऱ्यासारखा कोसळलाय. आधीच यंदा पाऊस रुसून बसलाय, त्यामुळे एव्हाना या महिन्यात हिरवगार असणारं शिवार फक्त ढेकळांनी भरून गेलंय. त्यातही नांदेड, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, नागपूरमधील
शेतकऱ्यांनी मनाशी जिद्द बांधून, हरभरा, गहू, तूर आणि कपाशीची बेगमी केली. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने या पिकांवर वरवंटा फिरवलाय. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झालीये. नांदेडमध्येही गारपीट झालीये. तर नागपूर ग्रामीणमध्ये खातमारी परिसरात तसेच मौदा तालुक्यातही गारपीटचा  तडाखा.. तर अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झालीये. धामणगाव रेल्वे तालुक्यात गारपीट झालीये.  यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बोरी, चातारी, सावळेश्वर, माणकेश्वर, गंजगाव, कोपरा, देवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झालीये. तर चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील चिमूर शहर, नेरी, मासळ आणि खडसंगी भागात गारपीट झालीये.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram