CM Eknath Shinde NITI Aayog Meeting :नीती आयोगाच्या बैठकीनंतरच्या फोटोत मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत
Continues below advertisement
एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असतानाच तिकडे बिहारमध्येही पुढील ४८ तासांत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जातंय. नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा केल्यानं एनडीएमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं बोललं जातंय.. त्यातच नितीश कुमार यांनी जेडीयूचे आमदार आणि खासदारांची पाटण्यात महत्त्वाची बैठक बोलावलीय.. तत्पूर्वी काल जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी पक्षातून राजीनामा दिलाय. भ्रष्टाचाराच्या आरोपांदरम्यान आरसीपी सिंह यांनी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जातंय..
Continues below advertisement