CM Eknath Shinde & DCM Ajit Pawar Devendra Fadnavis यांच्यात दोन तास बैठक, मराठा आरक्षणावर चर्चा
Continues below advertisement
काल रात्री उशिरा वर्षावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात दोन तास बैठक झाली. यावेळी धनंजय मुंडेदेखील वर्षावर उपस्थित होते. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचं कळतंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्याने त्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. तसेच इतरही काही विषयांवर चर्चा झाल्याचं कळतंय. दरम्यान, मराठा आरक्षणावरून सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जाणार असल्याचंही कळतंय.
Continues below advertisement