Chhagan Bhujbal v/s Manoj Jarange : याद राख माझ्या शेपटीवर पाय ठेवायचा प्रयत्न करु नकोस- भुजबळ
Continues below advertisement
जानेवारी २०१६ ते मे २०१८ या सव्वा दोन वर्षांच्या काळात भुजबळ जेलमध्ये होते. जेलमधून बाहेर आल्यावर ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले, मात्र ते आधीचे डॅशिंग आणि आक्रमक भुजबळ नव्हते. आज जालन्यात मात्र भुजबळांचा ८० आणि ९०च्या दशकातला अवतार पाहायला मिळाला. मनोज जरांगेंना त्यांनी ज्याप्रकारे आव्हान दिलं, त्यांची भाषा, त्यांची देहबोली आणि आवाजातले चढउतार...सगळंच उपस्थितांना थकित करणारं होतं. त्यामुळे, सध्याचा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाच्या निमित्ताने छगन भुजबळ पुन्हा प्रकाशझोतात आणि आधीच्या आवेशात आल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement