Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा : ABP Majha
सावरकरांच्या वक्तव्यावर माफी मागितल्याशिवाय, राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांची एकजूट घडवून आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. त्याच मुद्द्यावर राहुल गांधींनी नुकतीच शरद पवार आणि नीतिशकुमार यांची भेट घेतली होती. लवकरच ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे. दोन सर्वोच्च नेत्यांमधली ही भेट ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी होऊ शकते.