दिल्लीत फडणवीस आणि शेलार यांचं येणं सामान्य पण मी दिल्लीत असणं मात्र विशेष : Chandrakant Patil
गेल्या दोन-तीन दिवसापासून भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय. भाजपचे महत्त्वाचे नेते दिल्ली मुक्कामी आहेत आणि गुप्त भेटी घेत आहेत. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी धावाधाव सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र भाजपच्या दृष्टीने या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातून भाजपची सत्ता जाऊन पावणे दोन वर्ष झाली आहेत. त्यात कोरोनाची लाट आली. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर कुठल्याही घडामोडी झाल्या नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपचे दिग्गज नेते चार दिवस दिल्ली मुक्कामी आहेत. आणि यातून प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत पाटील यांची गच्छंती होऊ शकते.भाजपकडून सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांची चर्चा आहे.