संजय राठोडांचा राजीनामा घेतला मग अनिल देशमुख यांचा राजीनामा का घेत नाही? चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे सरकारला हादरे बसत असताना भाजपनं आता दोन मंत्र्यांना टार्गेट करत मिशन अनिल सुरु केल्याचं दिसतंय. भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच परिवहन मंत्री अनिल परब यांनाही टार्गेट केलं आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं. गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा इशाराच भाजप नेत्यांनी दिलाय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या या दोघांनी काल शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आणि अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ पुढचं टार्गेट अनिल परब असतील असे स्पष्ट संकेत दिले.
Continues below advertisement
Tags :
Chandrakant Patil