Nanded Lockdown | 25 मार्चपासून नांदेड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, सकाळी 7 ते 10 दरम्यान भाजीखरेदीसा मुभा
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यानं पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. 25 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत 11 दिवसांचा हा लॉकडाऊन असेल. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक घेतली. त्यात पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनानं लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. मात्र, या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वस्तू आणि सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेणार आहे. त्याशिवाय सकाळी 7 ते 10 या वेळेत नागरिकांना भाजीपाला खरेदी-विक्रीची मुभा देण्यात आली आहे.