Chandrakant handore Meet Nasim Khan : नसीम खान यांची नाराजी, चंद्रकांत हंडोरेंचा सबुरीचा सल्ला
सलमान शेख
Updated at:
30 Apr 2024 08:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवारी दिल्यानं आमदार नसीम खान नाराज झाले आहेत. त्यामुळं या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमसीए क्लबहाऊसमध्ये संपन्न झाली.या बैठकीला नसीम खान यांच्यासह भाई जगताप, सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. वर्षा गायकवाड या पक्षानं दिलेल्या उमेदवार आहेत, त्यामुळं त्यांना आमचा विरोध नाही, असं खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केलं. नसीम खान यांची समजूत काढण्यासाठी आणि उत्तर मुंबईत मुस्लिम उमेदवार देता येईल का, याची चर्चा करण्यासाठी ही बैठक घेतल्याचं त्यांनी सांगितलं.