Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर 23 May 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुष्काळसदृष्य परिस्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथील करा, सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती, तर मुख्यमंत्र्यांची आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक
मुंबईच्या जलसाठ्यात घट, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ४१ दिवस पुरेल इतकाच साठा, पावसाच्या स्थितीच्या आढाव्यानंतर पाणी कपातीचा निर्णय होणार
बिघडलेली कार चालवायची परवानगी अगरवालने मुलाला दिलीच कशी? चालकाच्या कथित जबाबावर सवाल उपस्थित
अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग;
अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले, एकाचा शोध सुरु, बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना
उजनी धरण क्षेत्रात बुडालेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले, ४० तासांनी उजनीतील शोधकार्य थांबलं
पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस निवडणुकी दरम्यान केलेल्या खर्चात तफावत आढळल्याने विचारणा
पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस निवडणुकी दरम्यान केलेल्या खर्चात तफावत
आढळल्याने विचारणा
करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन, बाथरुममध्ये पाय घसरुन पडल्याने डोक्याला दुखापत, उपचारादरम्यान वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सचिन खिलारीने पटकावलं सुवर्णपदक, पुरुषांच्या गोळाफेक क्रीडा प्रकारातील एफ-४६ गटात आशियाई विक्रम