Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना सीबीआयचं समन्स, दारु कंत्राटात घोटाळ्याचा आरोप
दिल्लीतील मद्य घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अबकारी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. सीबीआयने सोमवारी सकाळी 11 वाजता मनीष सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावले आहे. समन्स पाठवल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी ट्विट केलंय. 'घरावर 14 तास सीबीआयने छापा टाकला, काहीही सापडले नाही. बँकेच्या लॉकरची झडती घेतली, त्यातही काहीही सापडले नाही. माझ्या गावात त्यांना काही सापडले नाही. आता त्यांनी मला उद्या सकाळी ११ वाजता सीबीआय मुख्यालयात बोलावले आहे. मी जाऊन पूर्ण सहकार्य करेन. सत्यमेव जयते' असं ट्वीट त्यांनी केलंय.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Manish Sisodia CBI Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS