Ajit Pawar On Sharad Pawar : 4 दिवस सासूचे संपले, 4 दिवस सुनेचे येऊ द्या; अजित पवारांचा टोला
सलमान शेख
Updated at:
16 Apr 2024 11:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या दणक्यात प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामती मतदारसंघात सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येवूद्या. आपण घरची लक्ष्मी म्हणून सूनेकडे पाहतो. मग ४० वर्ष झाले तरी बाहेरची कशी? असा टोला अजित पवार यांनी शरद पवारांना लगावला.