Buldhana Rename : आता अधिकृत! बुलडाणा नव्हे, बुलढाणा! जिल्हा प्रशासनाप्रमाणे बुलढाणा हेच नाव योग्य
बुलडाणा की बुलढाणा हा संभ्रम आता दूर झालाय. यापुढे बुलढाणा असाच उल्लेख केला जावा असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंय. जिल्हा माहिती कार्यालयाकडून तसे निर्देश देण्यात आलेत. एकेकाळी थंड हवेचं ठिकाण असलेलं भिलठाणा इंग्रजांच्या काळात जिल्हा मुख्यालय झालं. कालांतरानं त्याचं नामकरण झालं. पण बुलढाणा की बुलडाणा असा संभ्रम कायम राहिला. बुलढाणा हेच नाव योग्य आहे, गॅझेटमध्येही तसाच उल्लेख आहे असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केल्यानं हा संभ्रम आता दूर झाला आहे