Shivsena BJP : न केलेल्या वक्तव्यावरुनच राजकीय घमासान, स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून पुन्हा वाद
राज्यसभेत 12 खासदारांच्या निलंबनावरुन एक वक्तव्य झालं आणि इकडे महाराष्ट्रात भाजपनं त्यावरुन शिवसेना खासदारांवर टीकास्त्र सोडलं. पण मुळात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचं हे वक्तव्य शिवसेना नव्हे तर केरळमधल्या माकप खासदारांनी केलेलं होतं. त्यामुळं एका न केलेल्या वक्तव्यावरुनच राजकीय लढाई रंगवण्याचा प्रयत्न झाला. आपण पाहूयात की, नेमकं काय घडलं?