BJP Targets Mumbai Baramati : भाजपच्या निशाण्यावर ठाकरे-पवारांचा गड, मुंबई - बारामतीवर लक्ष केंद्रीत

Continues below advertisement

महाराष्ट्रात ठाकरे-पवारांना धोबीपछाड देऊन सत्तांतर घडवल्यानंतर भाजपनं आता ठाकरे-पवारांच्या बालेकिल्ल्यांना लक्ष्य केलंय.... दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरेंवर जोरदार राजकीय वार केल्यानंतर आता भाजपनं आता पवारांच्या बारामतीला टार्गेट केलंय. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या ठाकरे आणि पवारांचे मुंबई आणि बारामती हे बालेकिल्ले भाजपनं लक्ष्य केले आहेत. दोन दिवसांत अमित शाह यांनी मिशन मुंबईचा श्रीगणेशा केला आणि उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानं आज भाजपच्या मिशन बारामतीची सुरुवात होतेय. त्यामुळे एकीकडे ठाकरेंना आव्हान देताना दुसरीकडे पवारांनाही भाजपनं लक्ष्य केलं आहे......

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram