Amit Shah Full Pc : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवला

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा ( J P Nadda)  यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आलाय. जून 2024 पर्यंत नड्डाच भापजचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिलीय. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुका जे. पी. नड्डा यांच्याच अध्यक्षतेखाली लढवल्या जातील असे देखील अमित शाह यांनी सांगितले. 

नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर नड्डांचं काय होणार याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. हिमाचल हे नड्डांचं गृहराज्य आहे. तिथेच पराभूत झाल्यानं नड्डांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या प्रतिमेवर काही परिणाम होतो का याचीही चर्चा होती. परंतु, आज दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डांनाच पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.    

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola