Parliament Ramesh Bidhuri : भाजप खासदाराची भर सभेत शिवीगाळ, रमेश बिधुरींची दानिश अलींना शिवीगाळ
Continues below advertisement
संसदेमध्ये मतभेद होणं हे नित्याचं आहे, आणि अपेक्षित देखील आहे. भाजपच्या एका खासदारनं मात्र गुरुवारी रात्री सभागृहात शिवीगाळ केली, आणि अनेक असंसदीय शब्दांचा देखील वापर केला. रमेश बिधुरी असं या खासदाराचं नाव आहे. ते दक्षिण दिल्लीचे खासदार आहेत. बिधुरी चांद्रयान-३ मोहिमेवर बोलताना बसपा खासदार दानिश अली शेरेबाजी करत होते. त्याचा बिधुरी यांना राग आला, आणि त्यांनी थेट शिव्या देण्यास सुरुवात केली.
Continues below advertisement