Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!

पुणे : मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी यांच्या विरोधात बोलतोय असं नाही. जर तसं असेल तर मी शांत बसतो, घाना देशात राहून जातो पण तुम्ही संतोष देशमुखला परत आणाल का? त्याच्या कुटुंबीयांना न्याय द्याल का? असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विचारला. जोपर्यंत संतोष देशमुखचे मारेकरी फासावर जात नाही तोपर्यंत मनात राग ठेवा असं आवाहन त्यांनी केलं. तसेच बीडचा बिहार नाही तर यांनी हमास आणि तालीबान करून ठेवलाय अशी जहरी टीका सुरेश धस यांनी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. 

बीडचा यांनी हमास, तालिबान केला

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, काबुलीस्तान आणि तालिबान केला असल्याची टीका सुरेश धस यांनी केली. ते म्हणाले की, "माझा रंगही काळा आहे. तुम्ही म्हणाल तर घाना देशात जाऊन राहतो. पण मग संतोष देशमुखला परत आणू शकाल का? संतोष देशमुख तिसऱ्यांदा सरपंच झाला. पण अजून त्याच्या कुटुंबीयांना राहायला घर नाही. त्यांना न्याय मिळालं पाहिजे, यात कसलं राजकारण आहे?"

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola