BJP taunts Aaditya | एका 'बबड्याच्या' हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा, भाजपची टीका

Continues below advertisement

नवी दिल्ली : एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केलं आहे. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार...! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कुलपती म्हणून मा.राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram