Udayanraje Bhosale Full PC : 18 एप्रिलला उदयनराजे उमेदवारी अर्ज दाखल करणार : ABP Majha
साताऱ्यातून भाजपकडून अखेर उदयनराजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत साताऱ्याच्या जागेवर पेच निर्माण झाला होता... या जागेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही होती.. तर दुसरीकडे साताऱ्यातून तिकीट मिळावं यासाठी उदयनराजेंनी दिल्लीत तळ ठोकला होता.. आता अखेर उदयन राजेंना उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळे महायुतीमधील सातारा जागेचा तिढा सुटलाय. मात्र साताऱ्याची जागा अजित पवारांनी भाजपला सोडल्यामुळे नाशिकची जागा कुणाच्या वाट्याला येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे..