Bajrang Sonawane : Sharad Pawar यांना सोडून गेलो तर वडील मारतील, बायको नाश्ता देणार नाही

बीड जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. पण मी शरद पवार साहेबांना सोडले तर पब्लिक मला मारेलच, पण बायकोही नाश्ता द्यायची नाही, अशी मिश्कील टिप्पणी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केली.  अमोल मिटकरी यांनी मंगळवारी बजरंग बप्पा हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, बजरंग सोनवणे यांनी हे सर्व आरोप नाकारले होते. यानंतर त्यांनी बुधवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अजित पवार यांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, हे समजायला अमोल मिटकरी हे काय टेलिफोन ऑपरेटर आहेत का? कारण अजितदादांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, याची माहिती त्यांच्या टेलीफोन ऑपरेटरकडेच असू शकते. कुणाला काय राजकारण करायचं ते करुद्या, त्याला काय उत्तर द्यायचं, ते मी बघेन. शरद पवारांची ताकद महाराष्ट्रच काय, तर अख्ख्या देशाने पाहिली आहे, ती पचवता येत नसल्याने संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola