Amaravati Bachhu Kadu : निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे बच्चू कडूंना पडलं महागात

Continues below advertisement

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे राज्यमंत्री बच्चू कडू यांना महागात पडलं आहे. राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बच्चू कडू यांच्याकडून या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. 

बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबाबतची माहिती लपवली होती. याबाबत चांदूरबाजार येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अन्वये गुन्हा सिद्ध झाला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram