Pune : Kirit Somaiya यांच्या सत्काराला कॉंग्रेसचा विरोध, पुणे महापालिकेला छावणीचं रूप : ABP Majha

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर आहेत. महापालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायऱ्यांवर भाजप सोमय्या यांचा सत्कार करणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. हिंमत असेल तर सोमय्यांना रोखून दाखवा असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. तर काँग्रेसनं सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला विरोध केलाय. त्या कार्यक्रमाला महापालिकेने परवानगी दिल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिलाय. त्यामुळे आज पुन्हा राजकीय संघर्ष होणार का याकडे लक्ष लागलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola