Bacchu Kadu: काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं नाही- बच्चू कडू

Continues below advertisement

कोरोना महामारीचा संसर्ग कमी होत असून बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागानं कळवलं, पण त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणचे विद्यार्थी आक्रमक होत थेट रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा ऑफलाईन घेऊ नये, अशी मुख्य मागणी यावेळी विद्यार्थी करत आहेत. दरम्यान राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं मत असं नाही तसंच यात काही चूकीचे लोकही असतील असं मतही त्यांनी दिलं आहे. तसंच या सर्वाची चौकशी केली जाईल आणि आंदोलनातील मागण्यांवर चर्चाही केली जाईल असं कडू यांनी म्हटलं आहे. या आंदोलनातील मागण्यांवर चर्चा केली जाईल. तसंच परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन हे ठरवण्यासाठी कोणालाही सल्ला द्यायची गरज नाही. हे निर्णय घेण्यासाठी शिक्षणविभाग परिपूर्ण असल्यांचही बच्चू कडू म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram