Amravati : दुकानात मद्यविक्री विरोधात भाजपचं आंदोलन, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

राज्य सरकारने किराणा दुकानात मद्यविक्री होणार असल्याची घोषणा केली. मात्र, या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे, अमरावती शहरातील राजकमल चौकात भाजपाने किराणा दुकानातील दारूविक्री विरोधात आंदोलन करत चक्क भर चौकात प्रतिकात्मक वाईनचं दुकान थाटून मद्यविक्री केंद्र सुरू केलं. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप भाजपने केला. यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola